फक्त मुद्द्याचं!

12th March 2026
गुन्हेगारी

गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 40 चोरीच्या दुचाकी केल्या जप्त; दोघे अटकेत

गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 40 चोरीच्या दुचाकी केल्या जप्त; दोघे अटकेत

पिंपरी : बावधन परिसरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 40 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 21 लाख 66 हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केली आहे.

viara vcc
viara vcc

अश्फाक इसाक पठाण (वय 32, रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार मुकुंद उद्धवराव हरदास (वय 25, रा. पाटोदा मावा, ता. परतुर जि. जालना) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी ही माहिती दिली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत दुचाकी वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदे गावातून दोन मार्च रोजी स्प्लेंडर मोटरसायकल चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट दोन कडे वर्ग करण्यात आला. उपायुक्त डॉ. शिवाजी पवार ,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

दुचाकी चोरीनंतर आरोपी कुठे गेला त्याने पुढे काय केले याचा तपास करणे ऐवजी पोलिसांनी उलट तपास करण्याची पद्धत अवलंबली .आरोपी घटनास्थळी कोणत्या मार्गाने आला याचा मागावा घेत त्या मार्गावरील सुमारे 70 ते 80 सीसीटीव्ही कॅमेरेच्या फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 7 मार्च रोजी बालेवाडी परिसरातून अश्फाक इसाक पठाण याला ताब्यात घेऊन अटक केली. पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील वाहन चोरीचे एकूण 34 गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीच्या मोटरसायकली खरेदी करणारा मुकुंद उद्धवराव हरदास यालाही अटक करण्यात आली.

आरोपी अशपाक पठाण यालाच स्प्लेंडर मोटरसायकल विशेष आवडत असल्याने तो प्रामुख्याने त्याच कंपनीच्या गाड्या चोरी करत होता. पाथर्डी येथे येथून बसने पुण्यात येऊन तो विविध भागातून दुचाकी चोरी करत असे. चोरी केलेल्या काही गाड्या तो एका ठिकाणी जमा करून ठेवत असे. त्यानंतर त्या दुचाकी फायनान्स कंपनीने हप्ते न भरल्यामुळे जप्त केलेल्या असल्याचे सांगून ओळखीच्या व्यक्तींना विक्री करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दळे, नितीन डोरजे, पोलीस हवालदार विक्रांत चव्हाण, विक्रम कुदळे, कृष्णा शितोळे, दीपक शिरसाट, पोलीस शिपाई प्रशांत सैद, सुखदेव गावंडे आणि रवी पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"