टेम्पोने दुचाकीस्वराला चिरडले; पती-पत्नीचा मृत्यू!

चाकण: भरधाव टेम्पोने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील पती-पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात खेड तालुक्यातील भांबोली गावाजवळ , चाकण- तळेगाव रोडवर झाला.अपघातात मनोहर शिवराम मेंगळे (वय 36) आणि त्याची पत्नी गीता मनोहर मेंगळे (वय 34, दोघेही रा. भांबोली, मळकाई वस्ती, ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दांपत्याचे नाव आहे.
राजू बाबू मसाळे (वय 40, सध्या रा. आंबेठाण, ता. खेड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हरिभाऊ शिवराम मेंगळे (वय 39, रा. भांबोली, मळकाई वस्ती, ता. खेड) यांनी उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्यांच्या ताब्यातील अशोक लेलँड टेम्पो भरधाव चालवत मोटरसायकलला समोरून धडक दिली .या अपघातात मोटरसायकल वरील पती-पत्नीचा मृत्यू झाला. उत्तर म्हाळुंगे पोलीस तपास करत आहेत.

दुचाकीवरून गांजाची वाहतूक; एकास अटक!
पिंपरी : दुचाकीच्या डिक्कीत गांजा बाळगुन विक्रीसाठी नेत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई भोसरी एमआयडीसी परिसरात रविवार 8 मार्च रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. विशाल दिलीप साळवे (वय 19, बालाजी नगर, एमआयडीसी भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार गजानन विष्णू आढे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत एक किलो 352 ग्रॅम वजनाचा सुमारे 67 हजार सहाशे रुपये किमतीचा गांजा विक्रीसाठी नेत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत तपास करत आहे. दुचाकी वरून गांजाची वाहतूक एकास अटक

