फक्त मुद्द्याचं!

9th March 2026
पुणे

पीएमआरडीएच्या विकासासाठी नियोजनबद्ध अर्बन डेव्हलपमेंट आराखडा तयार करणार: डॉ. अभिजित चौधरी

पीएमआरडीएच्या विकासासाठी नियोजनबद्ध अर्बन डेव्हलपमेंट आराखडा तयार करणार: डॉ. अभिजित चौधरी

पिंपरी :  पुणे आणि परिसराच्या विकासासाठी नियोजनबद्ध अर्बन डेव्हलपमेंटचा आराखडा तयार केला जाणार असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) नवनिर्वाचित महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. पुणे शहर आणि लगतचा परिसर राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून सुनियोजित नागरीकरणासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी पीएमआरडीएचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली.

viara vcc
viara vcc

पीएमआरडीएचे आयुक्त डॅा,योगेश म्हसे यांची बदली झाली असून त्यांच्या पदावर डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज सोमवार ( 9 मार्च) रोजी पदभार स्विकारला. याप्रसंगी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, सहआयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळते महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे व अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी डॉ. चौधरी यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शहरी आणि ग्रामीण भागातील विकासकामांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. पुणे जिल्हा हा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असून येथील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. मोठे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठीही ठोस उपाययोजना केल्या जातील असे ठामपणे सांगितले. मोठे रस्ते, एसटीपी प्लॅन्ट आणि पर्यावरण संवर्धनासाठीचे प्रकल्प यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

पीएमआरडीए अंतर्गत विकास आराखडा (डीपी) तयार करण्याबरोबरच आधुनिक अर्बन प्लॅनिंगवर भर दिला जाणार आहे. बांधकाम परवानगी प्रक्रियेमधील अडथळे दूर करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. चांगल्या कामांना लोकांचे सहकार्य मिळते, मात्र काही वेळा विकासासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात, असे ते म्हणाले .

सध्या सुमारे ४३ हजार कोटी रुपयांची कामे प्रत्यक्षात आणण्यावर भर दिला जाईल. ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागासाठी परवडणारी घरे, दळणवळण सुविधा आणि विकासाला चालना देणारे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी पुढील आठवडाभरात विविध विभागप्रमुखांच्या आढावा बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"