फक्त मुद्द्याचं!

2nd March 2026
गुन्हेगारी

ट्रकची जोरदार धडक ; दुचाकी वरील महिलेचा मृत्यू!

ट्रकची जोरदार धडक ; दुचाकी वरील महिलेचा मृत्यू!

चाकण: भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील महिला लक्ष्मी शिद्राम्मा स्वामी (वय 24) या मृत्युमुखी पडल्या. त्यांचे पती व लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार 28 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मौजे वराळे, ता. खेड गावचे हद्दीत वराळे- आंबेठाण रोडवर घडली.

याबाबत मयत महिलेचा दिर शांतलिंग शिवानंद स्वामी (वय 30, विमानतळ, लक्ष्मी नगर, सोलापूर) यांनी उत्तर माळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात ट्रकचालक अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी न नेता निघून गेला. चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ सिद्रामय्या शिवानंद स्वामी (वय 32 )त्यांची पत्नी लक्ष्मी सिद्रामय्या स्वामी (वय 24) व मुलगा श्रेयस (वय 4) हे त्यांच्या स्कुटी दुचाकीवरुन एम. एच. 12/ इ. वाय/ ८७११ वरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रक चालक धडक दिल्यानंतर ट्रक घेऊन फरार झाला. या धडकेत फिर्यादीची भावजय लक्ष्मी सिद्धरामय्या स्वामी (वय 24) हिचा मृत्यू झाला. उत्तर माळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खरात पुढील तपास करत आहे.

viara vcc
viara vcc

ऑनलाइन 1 लाख 86 हजार रुपयांची फसवणुक!
पिंपरी: एका व्यक्तीला आयफोन मोबाईलवर ट्राफिक पोलिसांचा खोटा मेसेज आला. तो ओपन केल्यानंतर एक लाख 86 हजार 442 ऑनलाइन पद्धतीने क्रेडिट कार्ड वरून काढून फसवणूक करण्यात आली. ही घटना 3 जानेवारी 2026 रोजी फ्लॅट नंबर चौदाशे चार, सी विंग 66, अव्हेणू ,पिंपळे निलख येथे घडली.

याबाबत एका व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका अनोळखी व्यक्ती (नाव पत्ता माहित नाही) विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या आयफोन मोबाइल मध्ये एक मेसेज आला. त्यामध्ये ट्राफिक पोलिसाचा पाचशे रुपये दंड झाला आहे असे दिसले. त्यावेळी फिर्यादी यांनी ऑनलाइन पैसे भरण्यासाठी मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारे प्रोसीड बटनावर क्लिक केले असता फिर्यादीच्या मोबाईल स्क्रीनवर दंडाची रक्कम 500 वरून अचानक एक लाख 86 हजार 442 असल्याचे दिसून आले. फिर्यादीच्या क्रेडिट कार्ड वरून फ्रॉड करून फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नांदेकर पुढील तपास करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"