फक्त मुद्द्याचं!

27th February 2026
गुन्हेगारी

किरकोळ भांडणातून गळा आवळून पत्नीचा खून ; पतीला अटक

किरकोळ भांडणातून गळा आवळून पत्नीचा खून ; पतीला अटक

पिंपरी: सावत्र वडिलांनी फिर्यादीच्या आईला हाताने मारहाण करून तिच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळून खून केला. ही घटना गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घर नंबर 116, उरुवेला हाऊसिंग सोसायटी, सेक्टर नंबर 22, ओटा स्कीम, निगडी येथे घडली. गायत्री राठोड (वय 37)असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी साई मनोज राठोड (वय 16, उरुवेला हाऊसिंग सोसायटी, सेक्टर नंबर 22 ,ओटा स्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मनोज बाळूभाई राठोड (वय 49, रा. 116 ,उरुवेला हाऊसिंग सोसायटी, सेक्टर नंबर 22, ओटास्कीम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे सावत्र वडील मनोज राठोड यांनी घरगुती कारणावरून फिर्यादी यांची आई गायत्री राठोड (वय 37) तिचे सोबत भांडण करून हाताने मारहाण केली. व फरशीवर पाडून गळ्यातील ओढणीने गळा आवळून खून केला. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ हे पुढील तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

लहान सिलेंडर मध्ये रिफिलिंग करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले!
चाकण: घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा साठा करून लहान सिलेंडर मध्ये रिफिलिंग करताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातआरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई बुधवार 25 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास चाकण- तळेगाव रोडच्या बाजूस राणूबाई मळा येथे करण्यात आली.

याप्रकरणी योगेश्वर औदुंबर कोळेकर (वय 39, पोलीस हवालदार, चाकण उत्तर पोलीस स्टेशन) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दत्ता ज्ञानोबा कोल्हे (वय 24, रा. निलेश जाधव यांच्या भाडेच्या खोलीत, रानुबाई मळा चाकण, ता. खेड ,मूळ रा. गडी गौडगाव, ता. कल्याण जि. बिदर )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे विनापरवाना घरगुती वापराचा ज्वालाग्रही गॅस सिलेंडरचा साठा करून त्यामधून लहान गॅस टाकीमध्ये रिफिलिंग केले जात होते. सुमारे सात हजार पाचशे रुपये किमतीचे मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू बाबत शासन व ग्राहकांची फसवणूक केली आहे. उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरखंडे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"