कुरुळी येथील हातभट्टीवर छापा ; पावनेतीन लाखाचे रसायन नष्ठ!

पिंपरी : हातभट्टीसाठी लागणारे दोन लाख 75 हजार रुपये किमतीचे पाच हजार पाचशे लिटर कच्चे रसायन आणि दहा हजार पाचशे रुपये किमतीची 105 लिटर तयार गावठी दारू पोलिसांच्या छाप्यात मिळून आली. ही कारवाई सोमवार 23 फेब्रुवारी रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास घाडगे, वस्ती कुरुळी, ता. खेड येथे करण्यात आली.
याबाबत राजेंद्र परमेश्वर खेडकर पोलीस कॉन्स्टेबल, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित राठोड (रा. फलके वस्ती, मोई, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी वरील हातभट्टीवर छापा टाकला .त्यावेळी 2 लाख 75 हजार रुपये किमतीचे 5500 लिटर कच्चे रसायन व दहा हजार पाचशे रुपये किंमतीची 105 लिटर तयार दारू संबंधित ठिकाणी मिळून आली. छाप्याची चाहूल लागताच आरोपी हा झाडाझुडपाच्या आडोशाने पळून गेला. मिळून आलेले सर्व साहित्य पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आले. दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार सुपेकर तपास करत आहेत.

एमएनजीएल गॅस चे बिल भरण्यास सांगून फसवणूक
पिंपरी : एमएनजीएल गॅस चे बिल भरायचे राहिले आहे ,असे सांगून बिल अपडेट फाईल पाठवून त्याद्वारे 1 लाख 15 हजार 235 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली .ही घटना 2 जानेवारी रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बजाज ऑटो लिमिटेड आकुर्डी येथे घडली.
याबाबत एका व्यक्तीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास कुमार (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) रक्कम ज्या बँक धारकाच्या अकाउंट वर गेली ते वेगवेगळ्या बँकेचे अकाउंटधारक ,अज्ञात व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना आरोपी यांनी संपर्क साधून एम एन जी एल गॅस चे बिल भरायचे राहिले आहे असे सांगून फिर्यादी यांना बिलाची अपडेट पाठवली. त्याद्वारे फिर्यादीने एक लाख 15 हजार 235 रुपयांची ऑनलाईन रक्कम जमा केली. मात्र नंतर त्यांना आपली फसवणूक झाली आहे हे समजले. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनसोडे हे तपास करत आहेत.

