फक्त मुद्द्याचं!

24th February 2026
महाराष्ट्र

भारतीय जनता पक्षाने कार्यकारणी न निवडता पदाधिकाऱ्यांची केली निवड!

भारतीय जनता पक्षाने कार्यकारणी न निवडता पदाधिकाऱ्यांची केली निवड!

मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ बन यांची नियुक्ती
मुंबई : भारतीय जनता पक्षाने राज्य कार्यकारिणी जाहीर न करता फक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे .यामध्ये संघटनेत भाकरी फिरवली असून मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या ऐवजी नवनाथ बन यांना संधी देण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

viara vcc
viara vcc

प्रदेश भाजप अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची काही महिन्यापूर्वी निवड झाली आहे .त्यानंतर निवडणूक आचारसंहिता व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळे प्रदेश कार्यकारणी व पदाधिकारी नेमणूक लांबली होती. भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी कोणाला करावे आणि कोणाला करू नये यापेक्षा कार्यकर्ता व पदाधिकारी हा सक्षम आहे का? याकडे लक्ष दिले आहे असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या वाटचालीत योगदान हे वर्षानुवर्ष आहे. याची कल्पना आहे. परंतु पदाधिकारी करताना अत्यंत मर्यादित संधी देता येते. रवींद्र चव्हाण यांनी प्रमुख मोर्चा व आघाडी प्रमुखांची नावे जाहीर केली आहेत.

भाजप पदाधिकाऱ्यांची यादी पुढील प्रमाणे
मुख्य प्रवक्ता – नवनाथ बन
प्रदेश उपाध्यक्ष – अतुल कळसेकर, भारती पवार. संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील, अर्चना पाटील चाकूरकर
भाजप सरचिटणीस – निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे, योगेश सागर
भाजप चिटणीस – मंगेश चव्हाण, परिणाम फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहनकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी, भैरवी घाक
भाजप युवा मोर्चा अध्यक्ष -कृष्णराज महाडिक,
भाजप महिला मोर्चा अध्यक्ष – चित्रा वाघ ,
भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष– योगेश टिळेकर,
कोषाध्यक्ष – मिहीर कोटेजा

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"