टेंम्पोने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू!

पिंपरी : एका तरुणास इंद्रायणी कॉर्नर टीप टॉप चौक येथे टेंम्पोने धडक दिल्याने तो नो पार्किंग मध्ये उभे असलेल्या टाटा ट्रकच्या पाठीमागे धडकून मृत्यू पावला. ही घटना रविवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास इंद्रायणी नगर भोसरी येथे घडली. विशाल अनिल कोटावले (वय 19) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मयत तरुणाचे भाऊ यश अनिल कोटावले (रा देवेंद्र कुटे यांच्या रूममध्ये, गणेश मंदिर कॉलनी, सद्गुरु नगर, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात पांढऱ्या रंगाचा छोट्या टेम्पो वरील चालक व नो पार्किंग मध्ये उभे असणाऱ्या टाटा ट्रक वरील चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ विशाल कोटावले (वय 19) हा राहते घरातून कामावर जात असताना इंद्रायणी कॉर्नर कडून आलेल्या एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या छोट्या टेम्पो ने हॉटेल टीप टॉप चौक येथे वळण घेऊन विशालच्या मोटरसायकली समोरून घासल्याने धडक चुकवण्याच्या नादात मयत विशाल मोटरसायकल सह नो पार्किंग मध्ये उभे असलेल्या टाटा ट्रक एम एच 14 जीसी 24 60 वर जाऊन धडकला. गंभीर जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला .भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भिसे पुढील तपास करत आहे.

