तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

पिंपरी : एका चाळीत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास पवारनगर थेरगाव येथे करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तुषार शेटे यांनी फिर्याद दिली आहे. शैलेश मेदनीकांत शर्मा (वय 40, रा. रशीकवाडी, जांबे), अशोक सोनाजी वडमारे (वय 65, रा. थेरगाव), संजय मच्छिंद्र मिसाळ (वय 45, रा.म्हातोबानगर, वाकड ),शकूर नजीर हवालदार (वय 36, रा. काळेवाडी), अक्रम दिलदार खान (वय 55, रा. थेरगाव) आणि दुर्गाराम रूपाराम पटेल (रा. पवार नगर थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार नगर येथील सूर्यमुखी गणेश मंदिराजवळील एका खोलीत संशयीत तीन पत्ती नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी तिथे छापा टाकला असता 5170 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य मिळून आले. दुर्गाराम पटेल यांच्या खोलीत हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले .

