ज्वेलर्स दुकानातील कामगाराने लांबविले 22 लाखाचे सोने; आरोपीस अटक!

पिंपरी : विश्वासाने कामगाराकडे सोने वितळण्यासाठी दिले असता सोन्यातून 22 लाख 5000 रुपये किमतीचे 245 ग्रॅम सोने कामगाराने काढून घेऊन फसवणूक केली. ही घटना 2 एप्रिल 2025 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रियंका ज्वेलर्स गांधीपेठ चिंचवडगाव येथे घडली .याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत देवेश कैलास वर्मा (वय 27, रा. फ्लॅट नंबर 601, ए. विंग, सिल्वर स्पून हॉटेल समोर, भुमकर चौक, वाकड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .श्रीमंता संतोष सामंता (वय 43, सध्या रा. प्रियंका ज्वेलर्स दुकानाचे चौथा मजला, गांधी पेठ, चिंचवड, मूळ रा. जोताकानुरामगड , जोताकानूसमगर, जि. पश्चिम मेदिनीपुर, पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा ज्वेलर्सचा व्यवसाय असून आरोपी फिर्यादीकडे सोने वितळण्याचे काम करतात. आरोपीकडे सोने वितळण्यासाठी दिले असता त्यांनी 22 लाख 5 हजार रुपये किमतीचे 245 ग्रॅम सोने स्वतःच्या फायद्या करता काढून घेऊन फिर्यादीची फसवणूक करून अपहार केला. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बळीप हे तपास करत आहेत.

