श्रीराम फायनान्स कंपनीत अपहार!

पिंपरी : श्रीराम फायनान्स कंपनीच्या कामगाराने कर्जदारांकडून कर्ज हप्त्याची वसूल केलेली 8 लाख 49 हजार 222 रुपये रक्कम फायनान्स कंपनीच्या कर्ज खात्यात न भरता कंपनीत अपहार केला. ही घटना जून 2024 पासून आज पर्यंत ऑफिस कार्यालय सर्वे नंबर 532, ऑफिस क्रमांक 40 व 42, तपस्वी प्लाझा, पहिला मजला आकुर्डी येथे घडली.

याप्रकरणी अमोल जालिंदर अवसरमल (वय 32, रा. ऐश्वर्या हमारा हाउसिंग सोसायटी, बिल्डींग नंबर ए पाच, फ्लॅट नंबर 104, देहू आळंदी रोड, चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आश्रय विश्वनाथ वाघमारे (वय 24, सध्या रा. विवेक नगर, आकुर्डी पोस्ट ऑफिस जवळ, मूळ रा. यशवंतनगर, मोहिते वस्ती, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर )असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनीचा कर्मचारी असून त्यांनी कर्जदारांकडून कर्ज हप्त्याची रोख रक्कम आठ लाख 49 हजार 222 रुपये स्वीकारली. कंपनीच्या कर्ज खात्यात ही रक्कम न भरता स्व:तासाठी वापरली. पैसे भरल्या बाबत खोट्या व बनावट पावत्या देऊन कर्जदारांची व कंपनीची फसवणूक केली. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे तपास करत आहेत.

