फक्त मुद्द्याचं!

15th February 2026
गुन्हेगारी

सोनसाखळी व दुचाकी चोरी करणारी टोळी अटकेत!

सोनसाखळी व दुचाकी चोरी करणारी टोळी अटकेत!

पिंपरी : काळेवाडी परिसरात सोनसाखळी हिसकवणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल सहा लाख पाच हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

viara vcc
viara vcc

संजय नरशिमलू नक्का (वय 29, रा. सोमेश कॉलनी, नांदेड ),आदर्श अनिल कामठीकर (वय 25, राम महावीर चौक, नांदेड )आणि संजू किशन गुडमलवार (वय 24, रा. गुरुद्वारा गेट नंबर दोन जवळ, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जालना जिल्ह्यातील एका गावातून आरोपींना पल्सर मोटरसायकल सह ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र त्यांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हे मूळचे नांदेड येथील असून त्यांना जालना येथून अटक करण्यात आली.

अटक आरोपीकडून 21.530 ग्रॅम वजनाचे तीन लाख 79 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, पाच पल्सर व दोन स्प्लेंडर अशा सात मोटरसायकली दोन, मोबाईल हँडसेट व खंजर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला . आरोपींनी काळेवाडी हद्दीत अनेक सोनसाखळी हिसकावणे व वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

सारंग आव्हाड अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ,बसवराज तेली अप्पर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग ,विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड यांचे मर्गदर्शनाखाली राजेंद्र बहिरट वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेवाडी ,सुरेंद्र धुमाळे पोलीस निरीक्षक गुन्हे ,तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गुरव ,श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे ,पोलीस हवालदार स्वप्निल घेतले, प्रमोद कदम ,अतिक शेख ,अशोक जायभाये ,भारत पारधी, विजय मोरे, अजय फल्ले ,रमेश खेडकर, रमेश ब्राह्मण, भास्कर भारती, मंगेश लोखंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"