परप्रांतीय तरुणाचा चुलत भावानेच केला खून!

पिंपरी: एका परप्रांतीय तरुणाची त्याच्या चुलत भावाने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास मौजे उर्से ,आंबेवाडी, ता. मावळ येथे घडली. लोकेश जगदीश निषाद (वय 38 मूळ रा.रौंदा, ता धम्मादा, जि. दुर्ग ,छत्तीसगढ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत यशवंत जगदीश निषाद (वय 30, नारायण नामदेव कारके यांच्या बिल्डिंगमध्ये, आंबेवाडी, उर्से, ता. मावळ मूळ रा. रौंदा , ता.धमधा, जि. दुर्ग ,छत्तीसगड) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .डिकेस होलकर निषाद (वय 27, मूळ रा. रौंदा, ता धमदा, जि. दुर्ग ,छत्तीसगड )असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही भाऊ मूळचे झारखंड राज्यातील असून हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. लोकेश जगदीश निषाद (वय 38 मूळ रा.रौंदा, ता धम्मादा, जि. दुर्ग ,छत्तीसगढ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी डिकेश ओलकर निषाद हा फरार आहे. दोघेही तरुण 11 फेब्रुवारी रोजी पुण्यातून उर्से,आंबेवाडी येथे एका इमारतीत भाड्याने राहण्यासाठी आले होते. ते गंवडी काम करीत होते. 12 फेब्रुवारी रोजी कामावरून परतल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर उर्से गावातील विठ्ठल मंदिराजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाईक तपास करीत आहेत.

