जादा परताव्याचे आमीष ; 1 कोटी 23 लाख रकमेची सायबर क्राईम द्वारे फसवणूक!

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तीनशे ते पाचशे टक्के परताव्याचे आमीष दाखवून वेगवेगळ्या मोबाईल ॲपद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडून 1 कोटी 23 लाख 21 हजार 161 एवढ्या रकमेची सायबर क्राईम द्वारे फसवणूक केली. ही घटना 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 पुराणिक सोसायटी महाळुंगे येथे घडली.

याप्रकरणी एका व्यक्तीने माहिती तंत्रज्ञान आधीकलम 66 (सी) व (डी) नुसार फिर्याद दाखल केली आहे. मोहन पाटील, रवी अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना आरोपी याने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास तीनशे टक्के ते पाचशे टक्के परताव्याचे आमीष दाखविले. फिर्यादीस वेगवेगळी मोबाईल ॲप पाठवून त्याद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांची 1 कोटी 23 लाख 21 हजार 161 एवढ्या रकमेची सायबर क्राईम द्वारे फसवणूक केली. फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी त्यांना अजून पैसे भरण्यास सांगितले. पैसे न भरल्यास तुमची काहीही रक्कम परत देणार नाही ,काय करायचे ते करा अशी धमकी दिली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

