जेनेसिस हाऊसिंग सोसायटीची बनावट ऑडिट द्वारे फसवणूक!

पिंपरी: जेनेसिस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी साई मंदिर जवळ,वडमुखवाडी, दिघी मधील सोसायटीच्या सदस्यांचे मेंटेनन्सचे सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचा बनावट ऑडिट द्वारे घोटाळा केला. ही घटना जानेवारी 2018 ते 1 फेब्रुवारी 2026 या दरम्यान जेनेसिस, सोसायटी वडमुखवाडी, दिघी पोलीस स्टेशन जवळ, ता. हवेली येथे घडली.

याबाबत विक्रम रामस्वरूप बक्षी (वय 58, राव्हिला नंबर 9, जेनेसिस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी वडमुखवाडी यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजी तापकीर, सचिन आदिती काशीकर, संतोष घुटके, मोहन सावते, देवेंद्र घोलप ,तानाजी तापकीर, जगदीश नारायण गावगर, साहेबराव दौंडकर, महेंद्र अडसूळ ,दीपक देशमुख, राहुल तापकीर, एम आर सलगर अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेनेसिस सोसायटीची तात्पुरत्या स्वरूपात स्थापना केलेल्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आरोपी क्रमांक एक ते तीन यांची एक्सपॅट प्रॉपर्टीज यांनी त्यांच्या मदतीला सदस्य म्हणून मोहन प्रॉपर्टीज यांची नियुक्ती केली. आरोपी क्रमांक 4 ते 12 यांनी मिळून सोसायटीमधील सदस्यांचे मेंटेनेसचे 70 ते 80 लाख रुपये घेऊन घोटाळा केला. बनावट ऑडिट रिपोर्ट बनवला व तो बनावट ऑडिट रिपोर्ट बनवण्यास ऑडिटर एम आर सलगर यांनी मदत केली. फिर्यादी व फिर्यादीच्या सोसायटीतील सभासदांची आर्थिक फसवणूक करून अपहार केला .चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरे हे पुढील तपास करत आहेत.

