सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून 35 लाख रुपयांची फसवणुक!

पिंपरी : सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून कॅनरा बँकेतील तुमचे बँक खाते मनी लॉन्ड्रींग साठी वापरले असल्याचे सांगितले. या कारवाईतून अटक वाचवायची असेल तर 35 लाख रुपये जबरदस्तीने आय सी आय सी आय बँक खात्यात भरण्यास सांगून फसवणूक केली. ही घटना 22 जानेवारी ते 31 जानेवारी 2020 या कालावधीत महालक्ष्मी हाइट्स, शॉप नंबर 20, मोरवाडी पिंपरी येथे घडली .

याप्रकरणी एका व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेलिफोन डिपार्टमेंट मधून बोलणारा अज्ञात व्यक्ती, सीबीआय अधिकारी आकाश कुमार, सीबीआय ऑफिसर जयस्वाल अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एक ते तीन यांनी सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीचे नावे कॅनरा बँक मध्ये खाते असल्याचे सांगितले. सदरचे खाते नरेश गोयल यांचे वर केलेल्या ईडी कारवाई मध्ये मिळून आल्याचे सांगितले. हे खाते मनी लॉन्ड्रींग साठी वापरले असल्याचे सांगून फिर्यादीस सदर कारवाई मधून वाचण्यासाठी फिर्यादीच्या बँक खात्यावरील रक्कम चेक करायचे आहे ,असे सांगून फिर्यादीस अटकेची भीती दाखवली. ही कारवाई थांबवायची असेल तर 35 लाख रुपये रक्कम धमकावून आयसीआयसीआय बँक खात्यावर पाठवण्यास लावून सदरचे बँक खाते रक्कम चेक केली. फिर्यादीस ही रक्कम परत केली जाईल असा विश्वास आरोपींनी दाखविला .मात्र ही रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केली .याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंभार हे तपास करत आहेत .

