फक्त मुद्द्याचं!

13th February 2026
गुन्हेगारी

जमीन खरेदीच्या नावाखाली एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणुक!

जमीन खरेदीच्या नावाखाली एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणुक!

पिंपरी : जागा खरेदी करून देतो असे सांगून ओळखीच्या दोन व्यक्तींनी मे 2011 पासून आज पर्यंत जमीन खरेदी न देता वेळोवेळी रोख व खात्यावर जमा केलेली रक्कम परत न करता सुमारे एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मे 2011 ते आजपर्यंत मौजे जांबे तालुका मुळशी गावचे हद्दीत घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत तुषार आत्माराम कलाटे (वय 45, बांधकाम व्यवसायिक, रा. सर्वे नंबर 240/ 2, अतुल पॅरेडीसो सोसायटी, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . याप्रकरणी राजेंद्र कोंडीबा शितोळे (रा.जांबे ता. मुळशी), हिरामण ज्ञानोबा वाझे (सर्वे नंबर 18, ओमकार कॉलनी, गणेश नगर, थेरगाव) असे आरोपींचे नाव आहे. गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन हे फिर्यादी यांच्या परिचयाचे असून फिर्यादी यांना मौजे जांबे तालुका मुळशी येथील जागा खरेदी करून देतो असे सांगून मे 2011 पासून आज पर्यंत जागा खरेदी न देता व वेळोवेळी आरोपी एक व दोन यांनी फिर्यादी कडून रोख स्वरूपात व बँक खात्यावर रक्कम घेतली आहे. ही रक्कम एक कोटी दहा लाख रुपयांची असून ती त्यांनी परत न करता फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"