फक्त मुद्द्याचं!

13th February 2026
गुन्हेगारी

बनावट नोटरी कागदपत्रे तयार करून नागरिकांची फसवणूक; एकाला अटक

बनावट नोटरी कागदपत्रे तयार करून नागरिकांची फसवणूक; एकाला अटक

पिंपरी : हिंजवडी परिसरात बनावट स्टॅम्प पेपर आणि नोटरी कागदपत्रे तयार करून शासनाची आणि नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ही घटना एप्रिल २०२५ दरम्यान हिंजवडी येथील ई-सुविधा इंडिया केंद्रामध्ये घडली.

पोलिस अंमलदार अजिनाथ सावंत यांनी फिर्याद दिली आहे. सिमांता कामीनी कुमार दास (वय ३२, नेरे, दत्तवाडी, मुळशी; मूळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मूळ स्टॅम्प पेपरची रंगीत छायांकित प्रत काढून त्याद्वारे बनावट नोटरी करारनामे तयार केले. या कागदपत्रांचा वापर करून कंपनीचे ओळखपत्र मिळवणे, बँक खाते उघडणे आणि गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी उपयोग केला गेला. अशा प्रकारे आरोपीने १० नागरिकांची सुमारे २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

निगडीत जुन्या वादातून तरुणावर सिमेंट ब्लॉकने हल्ला
पिंपरी : मित्रासोबत झालेल्या भांडणाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना बुधवारी (११ फेब्रुवारी) रोजी दुपारी साडेबारा वाजता साईनाथ नगर, निगडी येथे घडली.

यश शरद भोंगे (वय २५, घरकुल, निगडी) याने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम सीताराम गायकवाड (वय २४, साईनाथ नगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र आदल्या दिवशी झालेल्या भांडणाबद्दल विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेले होते. त्यावेळी संतापलेल्या आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या कपाळाला दुखापत झाली आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"