फक्त मुद्द्याचं!

13th February 2026
गुन्हेगारी

 बनावट सह्या करून जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम; दोघांवर गुन्हा दाखल

 बनावट सह्या करून जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम; दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : जमिनीच्या मोजणी वेळी फसवणूक करून आणि बनावट सह्या करून बेकायदेशीर बांधकाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सहा मे आणि सात मे 2022 रोजी पुनावळे (ता मुळशी) येथे घडली.

याबाबत योगेश वसंत वाणी (वय 50 रा.गोकुळ हॉटेल समोर, पिंपरी ) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. याप्रकरणी मुजफ्फर आली मुशाहिदआली सय्यद आणि महफूजआली सय्यद ( दोघेही रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीची जमीन विकत घेण्याचे सांगून समजुतीचा करारनामा केला. मात्र मोजणीच्या वेळी फिर्यादी हजर नसताना त्यांच्या खोट्या सह्या करून जमिनीची हद्द बदलण्यात आली. या मोजणीचा आधार घेऊन आरोपींनी फिर्यादीच्या जागी बेकायदेशीर बांधकाम करून त्यांची फसवणूक केली .रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

गावठी पिस्तूल बाळगून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक
पिंपरी : पुनावळे परिसरात बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल बाळगून महिलांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (१० फेब्रुवारी) डब्बा मेट कॅन्टीन, काटे वस्ती येथे घडली.

या प्रकरणी पोलिस अंमलदार नामदेव सालकर यांनी फिर्याद दिली आहे. नितीन गुलाबराव पाटील (वेब४२, अकलुज, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ५५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बेकायदेशीरपणे जवळ बाळगले होते. त्याने कौटुंबिक वादातून एका महिलेला आणि स्वतःच्या पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच जमा झालेल्या लोकांनाही शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. रावेत पोलिस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"