फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
गुन्हेगारी

सुप्रीम कोर्टाच्या फंडामध्ये रक्कम भरा, अन्यथा अटक करू अशी धमकी देऊन फसवणूक!

सुप्रीम कोर्टाच्या फंडामध्ये रक्कम भरा, अन्यथा अटक करू अशी धमकी देऊन फसवणूक!

  पिंपरी: एका व्यक्तीच्या मोबाईलवर वेगवेगळ्या नंबर वरून व्हाईस कॉल व्हाट्सअप व व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करून आम्ही मुंबई क्राईम ब्रँच वरून बोलत आहे.  सुप्रीम कोर्टाच्या फंडामध्ये 19 लाख 1000 रुपये रक्कम भरा अन्यथा अटक करू अशी धमकी देऊन फसवणूक केली. ही घटना 29 नोव्हेंबर ते आठ डिसेंबर 2025 या कालावधीत रा. फ्लॅट नंबर ए डी, बिल्डिंग प्लॉट नंबर 64, बी. यु. भंडारी सोसायटी, दिघी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली आहे.

viara vcc
viara vcc

फिर्यादी याने याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विविध मोबाईल क्रमांक, बँक अकाउंट खातेदार यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या वडिलांना विविध मोबाईल क्रमांकावरून व्हॉइस कॉल, व्हाट्सअप वर व्हिडिओ व ऑडिओ कॉल करून धमकविण्यात आले. तुमच्या आधार कार्ड वरून २४७ बँकेचे एटीएम कार्ड बनवण्यात आलेले आहेत. तुम्ही लोकांची फसवणूक करत आहात, तुमची फसवणूक करणारी एक टोळी आहे अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. तुमचे अकाउंट वरून मनीलॉन्ड्रीग होत आहे याची देखील आमच्याकडे माहिती आहे. ईडीची नोटीस फिर्यादी यांच्या वडिलांच्या व्हाट्सअप वर पाठविली. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या वडिलांना सांगितले की, तुमच्याविरुद्ध आमच्याकडे केस रजिस्टर झालेली आहे. तुमचे सोबत जे लोक काम करतात त्यांची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे असे सांगून त्यांनी व्हाट्सअप वर केसची प्रत आणि त्या टोळीतील इतर लोकांची माहिती पाठविली.

या गुन्ह्यामध्ये तुम्हाला आम्ही अटक करणार आहे. जर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली तर आम्ही तुम्हास तात्काळ अटक करू आणि तुमच्या सोसायटी मधून सगळ्या लोकांसमोर घेऊन जाऊ अशी भीती दाखवली. त्यानंतर मोबाईल नंबर वरून व्हाईस कॉल करून मी विश्वास नांगरे पाटील बोलत आहे. ,जर तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या फंडामध्ये आम्ही सांगू तेवढी रक्कम जमा केली तर तुमची अटक आम्ही थांबवू शकतो. फिर्यादीच्या वडिलांना एकूण 19 लाख एक हजार रुपये पाठवण्यास प्रवृत्त केले. अशा प्रकारे फिर्यादी यांचे वडिलांना अटक करण्याची धमकी दाखवून विविध मोबाईल क्रमांकावरून कॉल करणाऱ्या अनोळखी व्यक्तींनी त्यांची एकूण 19 लाख एक हजार रुपयेची आर्थिक फसवणूक करून रकमेचा अपहार केला. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहणे हे पुढील तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"