फक्त मुद्द्याचं!

11th February 2026
गुन्हेगारी

नातेवाईकाच्या लग्नासाठी नेलेली मोटार बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विकली!

नातेवाईकाच्या लग्नासाठी नेलेली मोटार बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विकली!

पिंपरी : नातेवाईकाच्या लग्नासाठी दोन-तीन दिवसाकरिता नेलेली मोटार बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 20 सप्टेंबर 2025 पासून ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात घडली.पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

viara vcc
viara vcc

याबाबत ऋषिकेश विठ्ठल महापुरे (वय 24 वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भालचंद्र सुखदेव थोरात (वय 38, वाल्हेकर वाडी, चिंचवड) यांना अटक केली आहे. त्यांच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची बारा लाख रुपये किमतीची आलिशान स्कार्पियो मोटार आरोपींनी लग्नाचे कारण सांगून नेली होती. त्यानंतर आरोपींनी संगणमत करून मोटारीचे बनावट आरसी बुक ,आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवले. या कागदपत्राच्या आधारे फिर्यादीची कोणतीही संमती न घेता मोटारीची परस्पर विक्री करून आर्थिक फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"