फक्त मुद्द्याचं!

26th March 2026
गुन्हेगारी

डुप्लिकेट चावीचा वापर करून दिवसाढवळ्या चोरी; एकास अटक!

डुप्लिकेट चावीचा वापर करून दिवसाढवळ्या चोरी; एकास अटक!

पिंपरी : दिवसाढवळ्या आज्ञात चोरट्याने डुबलीकेट चावीचा वापर करून घराच्या आत प्रवेश केला. घरातील एक लाख 23 हजार रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली .ही घटना शुक्रवार सहा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा ते सायंकाळी पाच या दरम्यान कैलास नगर गल्लीतील थेरगाव येथे घडली. याबाबत एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

देव विजय लोट (वय 19 रा. प्रीती दुर्गे यांचे रूम मध्ये, कैलास नगर, गल्ली नंबर 3, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल हरीश हरिजन उर्फ लोट (वय 26,रा. प्रीती दुर्ग यांचे रूम मध्ये, कैलास नगर, गल्ली नंबर 4, थेरगाव, मुळगाव ढिकोला, भीलवाडा, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी त्यांचा रूमचा दरवाजा हा लॉक लावून कामासाठी भोसरी येथे गेले असता अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने डुप्लिकेट चावीने कुलूप उघडून घराचे आत मध्ये प्रवेश केला. घरातील 80 हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे 13 हजार रुपये किमतीचे चांदीचे व 30 हजार रुपये रोख रक्कम असे एकूण 1 लाख 23 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली. याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण पुढील तपास करत आहेत. डुप्लिकेट चावीचा वापर करून दिवसाढवळ्या चोरी

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"