फक्त मुद्द्याचं!

25th March 2026
गुन्हेगारी

जादा नफा देण्याचे आमीष दाखवून महिलेची 61 लाख 64 हजार रुपयाची फसवणूक!

जादा नफा देण्याचे आमीष दाखवून महिलेची 61 लाख 64 हजार रुपयाची फसवणूक!

पिंपरी : जादा नफा देण्याचे आमीष दाखवून शेअर मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून एका महिलेची 61 लाख 64 हजार 941 रुपयाची फसवणूक केली आहे .ही घटना एक सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाइन घडली. एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

इशिका चोप्रा नावे असलेले मोबाईल नंबर, जयेश कौल नावे मोबाईल नंबर, रिचार्ज मॅनेजर (नाव माहित नाही )आणि ज्या बँकेमध्ये पैसे जमा केले ते खातेदार यांच्याविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीला वेळोवेळी मोबाईल वरून मेसेज पाठवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल असे सांगितले आणि विश्वास संपादन केला. आरोपीने 61लाख 64 हजार ९४१ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगून फिर्यादीचे पैसे अन्य बँक खात्यावर वळवून घेतले .त्या बँक खात्याचे धारक व वापरकर्ते यांनी व्हाट्सअप ग्रुप द्वारे मेसेज करून त्या बदल्यात फिर्यादीस कोणताही परतावा व नफा न देता फिर्यादीची 61 लाख 64 हजार 941 रुपयांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चासकर पुढील तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपी अटक
पिंपरी: विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई 4 फेब्रुवारी रोजी आंबेठाण येथे करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी विकी दीपक चव्हाण (वय 20, रा. सोनबळ वस्ती, आंबेठाण, ता. खेड, मूळ रा. धानोरा भुसे, जि. वाशिम) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस शिपाई शेखर खराडे यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडे 50 हजार रुपये किमतीचे देशी बनवतीचे पिस्तूल व एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस आढळून आले आहे. आरोपी विकी चव्हाण विरोधात भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत. देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपी अटक

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"