Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

लक्झरी बस मधून अफू व गुटख्याची वाहतूक; बस चालकाला अटक!

लक्झरी बस मधून अफू व गुटख्याची वाहतूक; बस चालकाला अटक!

पिंपरी : लक्झरी बस मधून अफू व शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एकूण 28 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई 4 फेब्रुवारी रोजी रावेत परिसरात करण्यात आली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणातील आरोपी श्रावणलाल बहादुरराम देवासी (वय 36, रा. मूळ -पाली, राजस्थान ,सध्या रा. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी बस चालक आहे. त्याच्यासह धनराज चौधरी आणि विनोद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील कॉन्स्टेबल सदानंद रुद्राक्ष यांनी फिर्याद दिली आहे .

रावेत येथे एका ट्रॅव्हलमधून गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून ट्रॅव्हलची पाहणी केली. त्यामध्ये 449.57 ग्रॅम अफिम आणि प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी तब्बल 28 लाख 5685 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ट्रॅव्हल्स चालक श्रावणलाल याच्याकडे चौकशी केली असता त्याने अफीम हे धनराज चौधरी यांनी दिले असून ते पुणे येथे पोहोचवायचे आहे. तर गुटखा हा पाली राजस्थान ट्रॅव्हल्स कार्यालयातून दिला असून तो विनोद नावाच्या व्यक्तीला द्यावयाचा असल्याचे चालक श्रवणलाल यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अन्य दोघांवर देखील गुन्हे दाखल केले आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"