फक्त मुद्द्याचं!

23rd March 2026
गुन्हेगारी

ट्रॅव्हल्स व्यवसायात जादा परताव्याचे आमीष दाखवून फसवणूक!

ट्रॅव्हल्स व्यवसायात जादा परताव्याचे आमीष दाखवून फसवणूक!

आरोपीस अटक
पिंपरी: वन वर्ल्ड टूर्स अँड ट्रॅव्हल्स या व्यवसायात 25 लाख रुपये गुंतवणूक केल्यास दर महिना चांगला परतावा मिळेल असे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक केली आहे. ही घटना 2017 ते 2026 या कालावधीत शगुन चौक पिंपरी येथील जवाहर लाईट्स इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स दुकानात पिंपरी येथे घडली.आरोपीस अटक करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जय शिवराय चौधरी (वय 40, रा साई चौक ,पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जयेश चौधरी यांचा वन वर्ल्ड टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा व्यवसाय असून या व्यवसायामध्ये 25 लाख रुपये गुंतवणूक केल्यास प्रति महिना 60 ते 70 हजार रुपये परतावा मिळेल असे आमीष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून चेक द्वारे 25 लाख रुपये गुंतवणूक स्वरूपात घेतले. सदर रकमेपैकी सहा लाख 62 हजार 241 रुपये परत केले. उर्वरित रक्कम 18 लाख 35 हजार 759 रुपये व परतावा न देता ,करारनामा न करता फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दलालवाड हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"