उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अनंतात विलीन!

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर उपस्थित झाले होते. शासकीय इतमामात, शोकाकुल वातावरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांचे चिरंजीव पार्थ व जय पवार यांनी दादांना मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित दादा प्रेमी नागरिकांचे मन गहिवरून आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवार 28 जानेवारी रोजी सकाळी विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. बारामतीतील काटेवाडीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्वपक्षीय नेते मंडळीची श्रद्धांजली
अजित पवारांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी या मैदानावर उपस्थित झाले होते. यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा, खासदार शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे मनसेचे राज ठाकरे, आरपीआय प्रमुख रामदास आठवले, मंत्री छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ, अनिल पाटील,मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आंध्र प्रदेश सरकारमधील नारा लोकेश, गिरीश महाजन, रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोरे, आदिती तटकरे ,गणेश नाईक,मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आंध्र प्रदेश सरकारमधील नारा लोकेश, गिरीश महाजन, रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोरे, आदिती तटकरे ,गणेश नाईक, , भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल ,खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, दत्तामामा भरणे, प्रफुल्ल पटेल, रितेश देशमुख, मेधा कुलकर्णी, निवेदिता माने ,अमोल कोल्हे, राजेश टोपे, सुरेश धस, संजय दिना पाटील, सचिन अहिर, मेघना बोर्डीकर, मकरंद पाटील, शंभूराजे देसाई, मंगल प्रभात लोढा, प्रकाश आबिटकर, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पार्थिवाला पुष्पगुच्छ अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखो जनसमुदाय उपस्थित होता.त्यापूर्वी सकाळी नऊ वाजेपर्यंत अजितदादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाछी काटेवाडी येथे ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोच्या जमावाला अश्रू अनावर झाले. पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अभूतपूर्व गर्दीला रोखणे पोलिसांना अशक्य झाले होते. त्यानंतर पार्थिव विद्या प्रतिष्ठान मध्ये आणण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार , दोन भगिनी तसेच सून यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. यानंतर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्यात आल्यानंतर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी अजितदादा अमर रहेजा गगनभेदी घोषणा दिल्या.

