फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

बनावट शेअर मार्केट ट्रेडिंगद्वारे 24 लाख रुपयांची फसवणूक!

बनावट शेअर मार्केट ट्रेडिंगद्वारे 24 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग यूआरएलच्या माध्यमातून ओटीसी शेअर ट्रेडिंग व आयपीओ साठी ग्रुप मधील आरोपी क्रमांक दोन यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण 24 लाख 6 हजार रुपये एवढी गुंतवणूक करण्यास भाग पाडून गुंतवलेल्या रकमेवर एक कोटी 46 लाख एवढे मुद्दल व नफा असल्याचे आमीष दाखवून फसवणूक केली. ही घटना 17 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान फिर्यादीचे राहते घरी घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत जयसिंग बाबुराव कुरळे वय 58, रा. बिल्डिंग नंबर 7 बी, फ्लॅट नंबर एक, एलआयसी कॉलनी, सेक्टर 25, प्राधिकरण निगडी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जगजीत सिंग, एआयसी मॅनेजर पेड्रो, बँक धारक खातेदारांच्या नावावर रक्कम जमा करण्यात आली व त्यांना मदत करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक याने द ब्राईट बुल्स या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग युआरएलच्या माध्यमातून ओटीसी शेअर ट्रेडिंग व आयपीओसाठी ग्रुप मधील आरोपी क्रमांक दोन यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर वेळोवेळी एकूण रक्कम 24 लाख 6 हजार रुपये फिर्यादीस गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांना गुंतवलेल्या रकमेवर एक कोटी 46 लाख रुपये एवढा मुद्दल व नफा असल्याचे आमीष दाखवून तसेच प्रॉफिट टॅक्सच्या नावाखाली 13 लाख 80 हजार एवढ्या रकमेची मागणी करून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"