फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

दोन लाख 19 हजार रुपयांचा गांजा जप्त; एकास अटक!

दोन लाख 19 हजार रुपयांचा गांजा जप्त; एकास अटक!

पिंपरी : बेकायदेशीररित्या अमली पदार्थ गांजा विक्रीकरिता जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. सुमारे दोन लाख एकोणीस हजार चारशे रुपये किमतीचा 4228 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही घटना मंगळवार 27 जानेवारी रोजी साडेआठच्या सुमारास रावेत पोलीस स्टेशन हद्दीत लोटस बिझनेस स्कूल समोरील, सैराट बिर्याणी हॉटेल जवळ रस्त्याच्या कडेला घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत कपिलेश कृष्णा इगवे वय छत्तीस पोलीस शिपाई, अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी शाहरुख गुलाब आत्तार (वय 25, रा. वैराग ता. बार्शी जि. सोलापूर), नागेश कांबळे (रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर, पूर्ण नाव माहित नाही) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी क्रमांक शाहरुख गुलाब आत्तार या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक याने राखाडी रंगाच्या बॅगमध्ये एकूण दोन लाख एकोणीस हजार चारशे रुपये किमतीचा 4228 ग्रॅम वजनाचा गांजा व एक मोबाईल बेकायदेशीररित्या विक्री करता ताब्यात ठेवला होता. आरोपी क्रमांक एक जवळ असलेला अमली पदार्थ गांजा हा माल त्याने नक्की कोठून व कोणाकडून आणला अशी चौकशी पोलिसांनी केली असता त्याने आरोपी क्रमांक दोन यांच्याकडून आणला असल्याचे सांगितले. याबाबत रावेत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"