फक्त मुद्द्याचं!

24th March 2026
गुन्हेगारी

गुंठेवारीतील फ्लॅट विक्री करता येत नसल्याचे सांगून 13 लाखाची फसवणुक!

गुंठेवारीतील फ्लॅट विक्री करता येत नसल्याचे सांगून 13 लाखाची फसवणुक!

पिंपरी : खरेदी खताच्या खर्चासह 20 लाख रुपये किमतीमध्ये फ्लॅट विकत देण्याचे आश्वासन देऊन पाच लाख रुपये घेऊन नोटराईज विसार पावती करून फ्लॅट खरेदीचे ऑनलाईन व रोख स्वरूपात 13 लाख 10 हजार रुपये घेतले .परंतु गुंठेवारीतील फ्लॅट विक्री करता येत नसल्याचे सांगून परस्पर दुसऱ्या व्यक्तीस फ्लॅट विकून फसवणूक केल्याची फिर्याद सांगवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना 29 जुलै 2021 ते आज पर्यंत झाली आहे .

viara vcc
viara vcc

याबाबत चंदू लक्ष्मण राठोड (वय 38, रा. फ्लॅट नंबर 102, तुळजाई निवास, काशीद वस्ती, भगतसिंग चौक, पिंपळे गुरव) यांनी राज लक्ष्मण राठोड, एक महिला व दीपक अशोक घाटे अशी आरोपींची नावे आहेत, आरोपी क्रमांक एक राज लक्ष्मण राठोड याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी संगणमत करून फ्लॅट खरेदी खताच्या खर्चासह 20 लाख रुपये किमतीमध्ये विकत देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला पाच लाख रुपये घेऊन नोटराईज विसार पावती व आप समजुतीचा करारनामा करून देऊन वेळोवेळी ऑनलाइन व रोख स्वरूपात 13 लाख 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीला फ्लॅटचा ताबा दिला व लवकरच खरेदी खत करून देतो असे आश्वासन दिले. त्यानंतर उर्वरित रक्कम घेऊन खरेदीखत करून देण्याऐवजी सदर फ्लॅट गुंठेवारीत असल्याने खरेदी खत होत नसल्याचे वारंवार आरोपीने सांगितले.

फिर्यादीला काही एक न सांगता परस्पर आरोपी क्रमांक तीन दीपक अशोक घाटे यास फ्लॅटचे खरेदीखत करून दिले. आरोपी तीन ने हिरो फायनान्स कडून 22 लाख 21 हजार 169 लाख रुपये कर्ज काढून तो फ्लॅट विकत घेतला आहे. त्यामुळे फिर्यादीची तेरा लाख 10 हजार रुपये आर्थिक फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"