पुणे सर्वसाधारण महिला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वसाधारण खुल्या गटाला महापाौरपद!

राज्यातील 29 महापालिकेतील महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर
मुंबई : राज्यातील 29 महापालिकेतील महापौर पदासाठी आज गुरुवार 22 जानेवारी रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. पुणे महापालिकेत सर्वसाधारण महिला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वसाधारण खुला गट असे महापाौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवाडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आनंद परांजपे या सोडतीच्या वेळी उपस्थित होते.
राज्यातील 29 महापालिकेंपैकी 50% महापालिकांवर महिलाराज असणार आहे. 50% महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने महिलांना सत्तेत वाटेकरी होता येणार आहे.14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे .50% आरक्षणानुसार चार महापालिकांमध्ये ओबीसी महिला, नऊ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे.
राज्यातील 29 महापालिकांचे महापौरपदांची आरक्षण सोडत पुढील प्रमाणे
सर्वसाधारण 17, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 8 ,अनुसूचित जाती 3 ,अनुसूचित जमाती 1 असे महापौर पदाचे आरक्षण असणार आहे.
महापालिकेसाठी पुढील प्रमाणे महापौर पदाचे आरक्षण
बृहन्मुंबई – सर्वसाधारण महिला,
ठाणे – अनुसूचित जाती खुला,
कल्याण डोंबिवली – अनुसूचित जमाती खुला,
नवी मुंबई – सर्वसाधारण महिला,
वसई विरार – सर्वसाधारण खुला,
मीरा भाईंदर – सर्वसाधारण महिला,
उल्हासनगर -ओबीसी खुला,
भिवंडी- निजामपूर- सर्वसाधारण खुला,
पनवेल – ओबीसी खुला,
पुणे – सर्वसाधारण महिला,
सांगली -मिरज- कुपवाड -सर्वसाधारण खुला,
कोल्हापूर – ओबीसी खुला,
पिंपरी चिंचवड = सर्वसाधारण खुला,
सोलापूर – सर्वसाधारण खुला,
नागपूर – सर्वसाधारण महिला,
अकोला – ओबीसी महिला,
अमरावती – सर्वसाधारण खुला,
चंद्रपूर – ओबीसी महिला,
नाशिक – सर्वसाधारण महिला,
मालेगाव – सर्वसाधारण महिला,
धुळे – सर्वसाधारण महिला,
जळगाव – ओबीसी महिला,
अहिल्यानगर – ओबीसी महिला,
छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण खुला,
लातूर – अनुसूचित जाती महिला,
नांदेड -वाघाळा – सर्वसाधारण महिला,
परभणी – सर्वसाधारण खुला,
इचलकरंजी – ओबीसी खुला,
जालना – अनुसूचित जाती महिला

