दुचाकी स्वाराने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू!

पिंपरी :आपल्या मुलासह रस्ता क्रॉस करत असताना एका दुचाकी स्वाराने धडक दिल्याने फिर्यादीचे वडिल गंभीर जखमी झाले. त्यांचा रुग्णालयात नेल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्वराज्य ट्रॅक्टर शोरूम समोर, खेड चाकण रस्त्यावर घडली.

याप्रकरणी शरण बसप्पा विठ्ठल कुंभार (वय 30, खडीमशीन संतोष नगर, भाम वाकीता, खेड )यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. प्रवीण चंद्रकांत रोडे (रा. गुळाणी, ता. खेड, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचे वडील रस्ता क्रॉस करत असताना मोटरसायकल क्रमांक एम. एच. 12 सी. एल 8202 वरील आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना जोरदार धडक दिली. यामध्ये फिर्यादीच्या वडिलांचा उजवा हात व उजवा पाय फ्रॅक्चर करून डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बुरुड हे पुढील तपास करत आहेत.

