फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

ऑनलाइन कामाचे आमीष दाखवून एका महिलेची फसवणूक!

ऑनलाइन कामाचे आमीष दाखवून एका महिलेची फसवणूक!

पिंपरी: ऑनलाइन कामाचे आमीष दाखवून एका महिलेची सुमारे तीन लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना एक ऑगस्ट ते 4 ऑगस्ट 2025 दरम्यान ऑनलाइन लक्ष्मी बालाजी, पीजी हिंजवडी, पेज नंबर तीन, माण, ता. मुळशी येथे घडली. याप्रकरणी एका 26 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

viara vcc
viara vcc

सृष्टी लक्ष्मी या नावाचे टेलिग्राम ग्रुप लक्ष्मी 852250 व फायनान्स या नावाचे @ फिनान्शियल डिपार्ट वन टेलिग्राम वर अज्ञात इसम नाव पत्ता माहीत नाही व वरील बँक खाते धारक व यूपीआय धारकांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीला एका अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप वरून मेसेज करून तुम्ही ऑनलाईन जॉब करणार आहे का असे विचारले. फिर्यादीने त्यास होकार दिला. फिर्यादीला आरोपीने एक व्हाट्सअप मोबाईल नंबर देऊन त्यावर दुसरा मोबाईल नंबर दिला आणि ट्रेली टेलिग्रामच्या लिंक वर ऍड होण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी ने telegram सृष्टी लक्ष्मी या नावाचे @ लक्ष्मी 852250 या ऍड ग्रुपमध्ये काही हॉटेलचे रेटिंगचे काम दिले.

त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून वेळोवेळी पैशाची मागणी करण्यात आली. फिर्यादीने त्यांच्याकडे कामाचे पैसे मागितल्यानंतर तुमचे पैसे ट्रेडिंगच्या ॲप मध्ये अडकले असून तुम्हाला ते पैसे काढायचे असेल तर आणखी पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यास फिर्यादीने नकार दिला. हॉटेल रेटिंग कामाचे टास्क देऊन फिर्यादी कडून वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे घेऊन फिर्यादीची तीन लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगणेकर पुढील तपासकरत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"