फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
गुन्हेगारी

रिक्षा चालकाला मारहाण करत लुटले!

रिक्षा चालकाला मारहाण करत लुटले!

 पिंपरी: सिग्नलला थांबलेल्या एका रिक्षा चालकाला जबरदस्तीने दुसऱ्या ठिकाणी नेऊन मारहाण करत लुटले. ही घटना शुक्रवार 9 जानेवारी रोजी बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत नितीन देवराम दवणे (वय 34 रा बोऱ्हाडेवाडी , मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकेश देवानंद परभणे (वय 20 ,रा. पांडवनगर, भोसरी), ओम संजीव चौधरी (वय 21, रा. चाफेकर चौक चिंच,वड), जयेश युवराज शिंदे ( रा शास्त्री चौक ,भोसरी आणि ओंकार विठोबा राऊत (वय 24, रा. शास्त्री चौक, भोसरी )या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांची रिक्षा घेऊन सिग्नलला थांबलेले असताना आरोपी त्यांच्या रिक्षात बसले. त्यांनी फिर्यादीला आळंदीला चल असे म्हणून देहू फाट्यावरून परत बोऱ्हाडेवाडी येथे आणले. तिथे आरोपींनी फिर्यादीला हाताने आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली .आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील सतराशे रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले .एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहे

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"