फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
महाराष्ट्र

विरोधकांना विकासकामांची आठवण करून द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला!

विरोधकांना विकासकामांची आठवण करून द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजित पवारांवर नाव न घेता टीका
पिंपरी :पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रचार रणधुमाळीत आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेत शेर शायरी द्वारे अजित पवारांचे नाव न घेता टीका केली. पिंपरी चिंचवड मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. फडणवीस यांनी प्रचार सभेच्या निमित्ताने अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.

viara vcc
viara vcc

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी महेश लांडगे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे महेश लांडगे जरा वैतागले आहेत, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो .अनेक जण आरोप करत आहेत. मात्र फडणवीस यांनी शायरीतून टोला लगावला.
“परिंदे को मिलेगी मंजिल एकदिन,ये उनके फेले हुये पंख बोलते है!
और वही लोग जो खामोश रहते है, अक्सर जमाने मे उनके हुनुर बोलते है!”

महापालिका क्षेत्रात गेल्या आठ वर्षात भारतीय जनता पक्षाने केलेल्या विकास कामांमुळे अजित पवार हे वैतागले आहेत. राग करत आहेत ,जरा समजून घ्या महेश दादा,ते रागावले म्हणून तुम्ही रागवू नका. विरोधकांनी काय काम केले हे सांगायला जागा नाही, अनेक प्रश्न त्यांना विचारले जातात, त्यांच्याकडे उत्तरच नाही त्यामुळे त्यांना आरोप प्रत्यारोपात ही निवडणूक गुंतवून ठेवायची आहे. मात्र आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलत राहिला हवे .आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही असे लांडगे यांना सांगितले. महेश लांडगे यांनी फक्त आपण केलेल्या कामांची आठवण करून द्या. म्हणजे टीका करण्याची गरज पडणार नाही असा सल्लाच फडणवीस यांनी दिला .

गेल्या सात ते आठ वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध विकास कामांच्या जोरावर पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा आपण बदललेला आहे .पिंपरी चिंचवड हे झपाट्याने वाढत असलेले शहर असून त्या दृष्टीनेच भविष्यात विचार करून आपल्याला पुढचा विकास करायचा आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने पावले उचलली पाहिजेत असे सांगितले. महापालिकेने अनेक योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या आहेत. त्याचा डंका देशभर झाला आहे. स्वच्छतेबाबत राज्यात महाराष्ट्र पहिला आला आहे. याच दृष्टीने आपण विकास कामे करू असे सांगितले. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, शहर भाजपा अध्यक्ष शत्रुघ्न काटे, राहुल कलाटे, सदाशिव खाडे आणि पिंपरी विधानसभा क्षेत्रातील उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"