बँक खात्यातून 92 लाख 79 हजार रुपये काढून फसवणूक; एकास अटक!

तन्मय पांडे या आरोपीस अटक
पिंपरी: एका महिला व्यक्तीच्या भाचीबरोबर इंस्टाग्राम वर ओळख वाढवून तीला फसवून फिर्यादीच्या बॅक खात्यातून एका व्यक्तीने आपल्या सहकार्याच्या मदतीने 92 लाख 79 हजार 400 रुपये काढून घेऊन फसवणूक केली. ही घटना 13 व 14 डिसेंबर रोजी रा. प्रिझम सोसायटी चर्होली बुद्रुक येथे घडली.

याप्रकरणी एका महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. तन्मय अमोल पांडे (वय 19, मूळ रा. यवतमाळ, सध्या रा. हिंजवडी, पुणे) आणि अन्य चार बँक खातेदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक एक तन्मय पांडे या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीच्या भाचीचा विश्वास संपादन करुन तिला फसवून आरोपीने एक परिवहन नावाची पाठवलेली लिंक फिर्यादी महिलेच्या मोबाईल मध्ये पाठवण्यास सांगून हे आप्लिकेशन फिर्यादीचे मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर ही लिंक फिर्यादीचे भाचीने मोबाईलवर पाठवून मोबाईल मध्ये अप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलचा कंट्रोल आरोपीने स्वतःकडे घेतला. आरोपी क्रमांक एक याने आरोपी नंबर पाच यांच्या मदतीने फिर्यादीचे बँकेमधून 92 लाख 79 हजार चारशे रुपये काढून घेऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आणि सदर रकमेचा अपहार केला आहे.
फिर्यादीच्या भाचीला फसवून फिर्यादीच्या बँकेमधून पैसे काढून घेणाऱ्या आरोपी नंबर एक, दोन, तीन व चार यांच्या बँक खात्यामध्ये फिर्यादीचे पैसे वितरीत झाले .त्या बँक खातेदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे पुढील तपास करीत आहेत.

