फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पुणे

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन!

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन!

पार्थिवावर आज दुपारनंतर अंत्यसंस्कार
 पुणे : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज मंगळवारी पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.

viara vcc
viara vcc

पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा धबधबा होता. पुण्याच्या राजकारणावर कलमाडी यांची बराच कालावधी पकड होती. सुरेश शामराव कलमाडी (जन्म 1 मे 1944) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नेते, माजी खासदार आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासका होते. काही काळ ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे उजवे हात म्हणून काम करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होईपर्यंत त्यांनी पवारांना साथ दिली. पुणे लोकसभा मतदारसंघाचे अनेक वेळा खासदार राहिले आहेत. भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे कलमाडी हे अध्यक्ष होते. कलमाडी हे भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिक राहिले आहेत. पुणे फेेस्टीव्हलचे ते जनक होते.

2010 मध्ये दिल्लीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा सुरेश कलमाडी यांच्यावर आरोप होता. त्यामुळे त्यांना अटकही झाली होती. परंतु खटला अद्याप सुरू झालेला नाही. एप्रिल 2025 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत क्लीन चीट दिली. मात्र त्यानंतर कलमाडी हे पुणेच्या राजकारणात पुन्हा कमबॅक करू शकले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"