रिक्षा चालकास कोयत्याने व लाथाबुक्याने मारहाण; दोघांना अटक!

पिंपरी : रिक्षात पॅसेंजर असताना दोन व्यक्तींनी रिक्षा चालकास आनंदनगर पिंपरी येथे सोडण्यासाठी सांगितले. त्यास रिक्षा चालकाने नकार दिल्याने त्यास कोयत्याने व लाथाबुक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवार ३ जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याचे सुमारास शिवाजी चौक शहापूरकर चहाचे दुकानासमोर चिंचवड येथे घडली.

याबाबत गजानन जगदेव इंगळे (वय 24, रा. गणेश स्कूल जवळ नेवाळे वस्ती, चिखली )यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. महेश महादेव पुजारी (वय 18, आनंद नगर झोपडपट्टी, चिंचवड) व उत्कर्ष हनुमान गुंडे (वय 18, अभिनंदन सोसायटी, बिल्डींग डी २१, रूम नंबर 706, घरकुल, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी स्वतःच्या रिक्षात पॅसेंजर बसवीत असताना आरोपी यांनी फिर्यादीस आनंदनगर पिंपरी येथे सोडण्यासाठी विचारले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास नकार दिला. यामुळे चिडून आरोपी क्रमांक एक याने त्याच्या कमरेचा लोखंडी कोयता काढून फिर्यादी व पॅसेंजरला जीवे ठार मारण्याच्या इराद्याने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.
हातातील कोयता हवेत फिरवत सार्वजनिक रस्त्यावर दहशत निर्माण केली. त्यामुळे जमा झालेले लोक सैराव्यारा पळू लागले. आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादीस हाताने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि जबरदस्तीने फिर्यादीचे मोबाईल मधून त्याचे मोबाईल स्कॅनरने 200 रुपये काढून घेतले. पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम हे तपास करत आहेत.

