शेअर ट्रेडिंग मधून जादा परताव्याचे आमिष दाखवून 67 लाखाची फसवणूक!

पिंपरी : फेसबुक वर जाहिरात देऊन शेअर ट्रेडिंग मधून पाच ते पंधरा टक्के खात्रीशीर नफा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीचा विश्वास संपादन करून विविध बँकांच्या बँक अकाउंट वर 66 लाख 87 हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याची फिर्याद सायबर गुन्हे शाखेकडे करण्यात आली आहे.ही घटना 10 ऑगस्ट ते 11 डिसेंबर 2025 या कालावधीत घडली.
याप्रकरणी नितेश विनोद कुमार खंडेलवाल (वय 36, रा. सी – तीन नंबर 803, ईडन गार्डन, ताथवडे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. कस्टमर सर्विस, विविध मेल आयडी आणि विविध बँकांच्या खातेदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फेसबुकवर जाहिरात देऊन शेअर ट्रेडिंग मधून पाच ते पंधरा टक्के खात्रीशीर नफा देण्याचे आमीष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या बँक अकाउंटवर एकूण 66 लाख 87 हजार रुपये एवढी गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
ही रक्कम काढण्यासाठी 15 टक्के इन्कम टॅक्सची मागणी करून गुंतवणूक केलेली रक्कम व नफा परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांनी नमूद आरोपी यांनी युआरएस धारक व पैसे पाठवलेल्या वरील वेगवेगळ्या बँक अकाउंट धारक यांच्या विरोधात व संबंधित आरोपींना मदत करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नाळे हे पुढील तपास करीत आहेत.


