फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

आर्थिक परताव्याचे आमीष दाखवून 61 लाख 9 हजार रुपयांची फसवणूक!

आर्थिक परताव्याचे आमीष दाखवून 61 लाख 9 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी: आर्थिक परताव्याचे आमीष दाखवून पुरे प्रॉफिट शेअर मार्केट कंपनीचे कॅपिटल मोनॅक ॲप मध्ये 34 लाख 89 हजार तसेच c5 इंडेक्स हंटर या ग्रुप वरील व्यक्तींनी 26 लाख 20 हजार रुपयांची अशी एकूण 61 लाख 9 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. अशी फिर्याद संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना तीन जून ते 2 डिसेंबर 2025 या दरम्यान एम्पायर स्क्वेअर, ई 402, चिंचवड, पुणे येथे घडली.

viara vcc
viara vcc

एका व्यक्तीने (वय 53 ,एम्पायर स्क्वेअर, ई 402, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पुरे प्रॉफिट शेअर मार्केट कंपनीचे धारक ज्योती, पूजा, निकेत शहा, पियुष अग्रवाल, c5 इंडेक्स हंटर या व्हाट्सअप ग्रुप वरील करणसिंग, अलोक (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) फिर्यादी मधील विविध बँक अकाउंट धारक यांच्याविरुद्ध संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना पुरे प्रॉफिट शेअर मार्केट कंपनीचे कॅपिटल मोनक ॲप मध्ये 34 लाख 89 हजार रुपये रक्कम शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एक सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत c5 इंडेक्स हंटर या ग्रुपवरील आरोपी करणसिंग, अलोक यांनी त्यांचे कॉनफेअर इन व्ही या ॲपमध्ये शेअर्स व आयपीओ मध्ये 26 लाख 20 हजार रुपये गुंतवणूक करण्यास लावून सदरची रक्कम व नफा परत न करता फिर्यादी यांची एकूण 61 लाख 9 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंभार पुढील तपास करत आहेत

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"