आंबेठाण चौक येथे 15 लाख 50 हजार रुपये किमतीचा गांजा पकडला ;तिघे अटकेत

गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलीस पथकाची कारवाई
चाकण: आंबेठाण चौक येथे तीन व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन संशयरीत्या जात असताना पेट्रोलिंग करीत असलेल्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलीस पथकाने संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील बॅगांची झडती घेतली असता 15 लाख 50 हजार 600 रुपये किमतीचा 31 किलो बारा ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा आढळून आला. ही कारवाई चाकण उत्तर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेठाण चौकात सोमवार 29 डिसेंबर रोजी करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.

अमोल श्रीकांत वेताळ पो. शिपाई,गुन्हे शाखा यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट चार पोलीस पथक चाकण परिसरात पेट्रोलिंग करीत असताना आंबेठाण चौकात तीन व्यक्ती पाठीवर बॅगा घेऊन संशयस्पदरीत्या जात होत्या. पोलीस पथकाचे सरकारी वाहन पाहून ते तेथून पळून जाऊ लागले. त्यामुळे पथकास त्यांचा अधिकच संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करून या व्यक्तींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या काळू आधार मोहिते (वय27), तुषार संजय देसले, (वय 33),दुर्योधन भागचंद पवार (वय 59),,(तिघेही रा आर्वी ता. जिल्हा धुळे ) अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्या बॅगांची झडती घेतली असता 15 लाख 50 हजार 600 रुपये किमतीचा 31 किलो 12 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा मिळून आला. त्यांचे विरुद्ध चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास चाकण उत्तर पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार लोणकर, मेरगळ, खराडे, जैनक, वेताळ, खेडकर, ननावरे यांच्या पथकाने केली .

