फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्याने दोघांना अटक!

पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्याने दोघांना अटक!

देहूरोड : अवैधरित्या व आदेशाचे उल्लंघन करून 52 हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवार 27 डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास कांतीलाल काळोखे मैदान ,तथास्तु बिल्डिंग जवळ देहू तळ्या चा माथा, तालुका हवेली येथे घडली.

याप्रकरणी अमर शांताराम कदम पोलीस शिपाई, गुन्हे विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विनायक अंकुश जांभुळकर (वय 34, रा. भोसले यांचे बिल्डिंगमध्ये, विघ्नहर्ता सोसायटी, देहूगाव), व विघ्नेश हनुमंत येळवंडे (वय 40, रा. निघोजे, तालुका खेड )असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सहा जानेवारी 2026 पर्यंत कोणताही स्फोटक पदार्थ ,ज्वलनशील दगड, शस्त्र ,तलवारी ,बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगणे याबाबत आदेश आहे. या आदेशाचा भंग करून आरोपी एक व दोन यांनी 52 हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगली. याबाबत ज्येष्ठ पोलीस उपनिरीक्षक वाव्हाळे हे तपास करत आहेत

viara vcc
viara vcc

अज्ञात बस चालकाने एका व्यक्तीस जोरदार धडक; एकाचा मृत्यू!
पिंपरी: अज्ञात बस चालकाने एका व्यक्तीस जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार 28 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास चांदणी चौकाच्या जवळ, मुंबई लेन सर्विस रोड बावधन येथे घडली.

याबाबत बंडू सोमीनाथ सांगळे पोलीस कॉन्स्टेबल, बावधन पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात बस चालकाने वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष करून बेदकार पणाने बस चालवून अज्ञात अनोळखी व्यक्तीस अंदाजे वय 40 , नाव पत्ता माहीत नाही, उजवे हातावर समाधान लिहिलेले) यास धडक देऊन गंभीर जखमी केले. बस चालक धडक देऊन जखमी व्यक्तीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. यामुळे जखमी व्यक्ती वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बावधन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करत आहेत

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"