मोठ्या परतावा रकमेचे आमीष दाखवून 34 लाखाची फसवणुक!

पिंपरी : मोठ्या परतावा रकमेचे आमीष दाखवून क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका व्यक्तीची 33 लाख 96 हजार ७३८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना 18 डिसेंबर ते 30 डिसेंबर दुपारी तीन दहा वाजण्याच्या सुमारास ऑनलाइन पध्दतीने वेदास पीजी, नारायणनगर ,हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी दिग्विजय सुरेश सुतार (वय 30, नारायणनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोबाईल नंबर वरील अज्ञात इसम (नाव व पत्ता माहित नाही) टेलिग्राम ग्रुप व बँक खाते नंबर यावरील खातेधारक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना फोन करून क्रिस्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला 30 ते 40 टक्के परतावा देतो असे सांगून सुरुवातीला फिर्यादीने गुंतवलेल्या पैशावर चांगली रक्कम देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादी ला वेगवेगळे खाते नंबर देऊन त्यावर क्रिस्टो करन्सी मध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादीने गुंतवणूक केलेले पैसे परत मागितले असता त्यांनी आणखी पैशाची मागणी केली. फिर्यादीची एकूण 33 लाख 96 हजार 738 रुपयांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे पुढील तपास करत आहेत.

