बनावट शेअर मार्केट ट्रेडिंगच्या माध्यमातून 55 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी: बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग युआरएलच्या माध्यमातून ओटीसी शेअर ट्रेडिंग व आयपीओ साठी 55 लाख 82 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याची फिर्याद निगडी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ही घटना पाच जुलै 2025 दुपारी एक वाजता ते 30 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ए 14, लोटस बिल्डिंग, रोनाल्ड बहार रेसिडेन्सी, निगडी येथे घडली.

याबाबत प्रशांत शरद वैद्य (वय 44 ,रा. ए 14 ,लोटस बिल्डिंग, कृणाल बहार रेसिडेन्सी, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्नेहा शारदा, डायरेक्टर नेमकुमार ,कस्टमर सर्विस, सुरज कुमार, येस बँक लिमिटेड, यूपी आयडी ,हिंदुस्थान बँक, येस बँक, इंडस्ट्रियल बँक, सारस्वत बँक, युको बँक ,बंधन बँक, बँक ऑफ बडोदा मधील अकाउंट नंबर वर गुंतवणूक करण्यास वेळोवेळी सांगण्यात येत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीस एम 8- इलाईट ट्रेडिंग सर्कल या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून त्यावर बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग यूआरच्या माध्यमातून ओटीसी शेअर ट्रेडिंग व आयपीओ साठी 55 लाख 82 हजार एवढी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांनी गुंतवलेल्या रकमेवर 14 कोटी 19 लाख 91 हजार पाचशे सात रुपये एवढे मुद्दल व नफा असल्याचे आमीष दाखवून बँक चार्जेसच्या नावाखाली 19 लाख 87 हजार 881 एवढ्या रकमेची मागणी केली. मनी लॉन्ड्रीच्या नावाखाली फिर्यादी यांनी गुंतवलेली रक्कम फ्रिज झाल्याचे सांगून आरोपींनी फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण हे याबाबत पुढील तपास करत आहेत.

