फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

पतीने पत्नीची केली 1 कोटी 40 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक!

पतीने पत्नीची केली 1 कोटी 40 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी: महिलेचा विश्वास संपादन करून विवाह केला. महिलेच्या पगाराचे पैसे व्यवसायासाठी वापरले .याशिवाय बँकांकडून कर्ज काढून सुमारे एक कोटी चाळीस लाख 44 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार जून 2023 ते आज पर्यंत पिंपळे निलख येथे घडला . याप्रकरणी एका महिलेने (वय 34, पिंपळे निलख) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

viara vcc
viara vcc

सतीश कुमार गणाला (वय 40, पिंपळे निलख, सांगवी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी महिलेशी विवाह करून तिचे येणारे पगाराचे पैसे स्वतःच्या व्यवसायासाठी वापरले. आरोपीला व्यवसायात तोटा झाल्यानंतर त्याने फिर्यादी महिलेचा विश्वासघात करण्याच्या उद्देशाने फिर्यादीला 58 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज काढण्यास लावून ते त्याच्या खात्यावर घेतले असे एकूण 64 लाख तीस हजार रुपये आरोपीच्या बँक खात्यावर घेतले.

त्याचप्रमाणे 17 लाख 64 हजार रुपयांचे आरोपीच्या नावावर कर्ज काढून फिर्यादीची परस्पर खोटी सही, बनावट दस्तऐवज तयार करून फिर्यादीला सहकर्जदार केले. ही रक्कम बँकेत आरोपीने न भरता फिर्यादी पासून पळून जाऊन एक कोटी चाळीस लाख 44 हजार इतक्या रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे. सांगवी पोलीस याबाबत पुढील तपास करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"