फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

एक लाख 44 हजार किमतीचा गांजा बाळगल्याने एकास अटक!

एक लाख 44 हजार किमतीचा गांजा बाळगल्याने एकास अटक!

पिंपरी :अवैधरीत्या एक लाख 44 हजार 800 रुपये किमतीचा दहा किलो 480 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी ताब्यात ठेवल्याने एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून एक व्यक्ती फरार आहे. ही घटना शनिवार 19 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांच्या सुमारास सिटी वन सोसायटी समोर, पंचे चौक, रावेत येथे घडली.

किरण अर्जुन जाधव पोलीस हवालदार खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . सिद्धार्थ बबन पेनकर (वय 38, रा. सुमनश्री अपार्टमेंट, चौथा मजला ,फ्लॅट नंबर सात, लिंक रोड चिंचवड) आणि समीर रा. मुंबई अशी आरोपींची नावे आहेत . सिद्धार्थ पेनकर या आरोपीस अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार आहे. आरोपी क्रमांक एक पेनकर याने आरोपी क्रमांक दोन समीर रा. मुंबई याचे कडून ओजी कुश (हायड्रोपोनिक) गांजा हा अमली पदार्थ विकत घेतला. पेणकर याने विक्रीसाठी तो ताब्यात ठेवला. पोलिसांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी छापा टाकून हा गांजा जप्त केला.

viara vcc
viara vcc

गांजा बाळगल्याने एकास अटक
पिंपरी :एका व्यक्तीने अवैधरित्या 99 हजार 300 रुपये किंमतीचा एक किलो 984 ग्रॅम निव्वळ वजन असलेला गांजा हा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीकरिता जवळ बाळगल्याने हिंजवडी पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. ही घटना शनिवार 19 डिसेंबर रोजी रात्री सात वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास रसिक वाडी, मित्र मंडळाच्या समोर, सार्वजनिक रोडवर ,जांबे पुणे येथे घडली.

रवी प्रकाश पवार पोलीस शिपाई, गुन्हे शाखा, युनिट दोन, पिंपरी चिंचवड यांनी फिर्याद दिली आहे. प्रेमराज लक्ष्मण पवार (वय 19, रा. सिद्धार्थ नगर काळभोर गोठा ,सरकारी दवाखान्यासमोर, आझाद चौक, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पेमराज पवार यांनी 99300 किमतीचा एक किलो 984 ग्रॅम निव्वळ वजनाचा गांजा हा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता रिक्षासह मिळून आला आहे. हिंजवडी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"