एमडी विक्री करता जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक!

पिंपरी :अवैधरित्या एकोणतीस हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ मॅफेड्रॅन (एमडी )विक्री करता जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे .ही घटना बुधवार 17 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास इंद्रायणी लेन नंबर चार मनोहर नगर कडे जाणाऱ्या रोडच्या कडेला तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी मुकेश शिवाजी मोहरे पोलीस उपनिरीक्षक ,तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.

ओम रवींद्र आभाळे (वय 22, फ्लॅट नंबर 62, कृष्णराव भेगडे शाळेसमोर, मनोहर नगर, तळेगाव दाभाडे ता. मावळ )असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने काळ्या रंगाच्या एम.जी हेक्टर गाडी एम .एच 14 एल .जे /७२१४ या गाडीतून मधून 29 हजार रुपये किमतीचा 39.89 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ घेऊन जात असताना ताब्यात घेतला. एमडी अमली पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीरपणे जवळ बाळगल्याने आरोपी ओम आभाळे याला तळेगाव दाभाडे पोलीससांनी अटक केली आहे. पोलिसांनी एमजी हेक्टर गाडी 20 लाख रुपये किंमत ,75 हजार किमतीचा ॲप्पल कंपनीचा मोबाईल असा एकूण 24 लाख 47 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहे

