फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केला खून; एका व्यक्तीस अटक!

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केला खून; एका व्यक्तीस अटक!

शिरगाव : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना शनिवार 13 डिसेंबर व 14 डिसेंबर रोजी उर्से ता .मावळ हद्दीत के .एल. टी कंपनीचे समोरील कच्च्या रोडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत घडली.

एका महिलेने (वय 27 )याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीरकुमार सिताराम मंडळ (वय 32, रा. गुलाब कारके यांचे खोलीत भाड्याने ,उर्से ,ता. मावळ मूळ रा. छपरीठाण , ठाकूरगंठी, जि. गोंडा ,राज्य झारखंड )असे आरोपीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीला चॉकलेट देण्याचे बहाण्याने सोबत नेऊन तिचे वर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पीडित अल्पवयीन तिचे घराशेजारी राहणारे आरोपी सोबत जाताना दिसल्याने गुन्ह्याचे चौकशी कामी आरोपीस ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे तपास केला असता त्याने गुन्हा कबूल केला. याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली असून शिरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत .

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"