पिंपरीत जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाचा खुन ; तिघांना अटक!

पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीला भोसकून ठार मारण्यात आले ,तर ही भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीस तीक्ष्ण हत्यारांनी वार करून जखमी केले, ही घटना मायस्कूल समोरील गेट जवळ, संजय गांधी नगर, पिंपरी येथे शुक्रवार 12 डिसेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पिंपरी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकीब छोटू शेख (वय 29, संजय गांधीनगर, गुप्ता जनरल स्टोअर्स जवळ, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. प्रेमउर्फ प्रेम्या प्रकाश डोंगरे (वय 18 ,डी. बिल्डिंग, रू. नंबर 9 ,मिलिंद नगर), संकेत नानासाहेब चौधरी वय 22, रा. साई कॉलनी, ज्योतिबा मंगलकार्यालयासमोर, काळेवाडी), जस्यु मनजीत पाल (वय 18, बी. नं.18, रूम नंबर 27, मिलिंद नगर पिंपरी), विशाल रावसाहेब बोरुडे (वय 19, रा. रूम नं. 14, बी. बिल्डिंग, मिलिंद नगर, पिंपरी )अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी क्रमांक एक, तीन व चार यांना अटक करण्यात आली आहे, तर आरोपी दोन हा फरार आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याचा भाऊ शकीब व आते भाऊ मलिक असे मायस्कूल शाळेजवळ बसलेले असताना आरोपी तिघेजण (एम. एच. 14 के .एम 29 21) या बुलेट दुचाकी वर तेथे आले व जुन्या भांडणाचा राग मनात धरून कट रचून आरोपी क्रमांक एक याने त्याच्या जवळील धारदार शस्त्राने फिर्यादीचा भाऊ शाकीब छोटू शेख (वय 25)याचे पोटात भोसकून व आरोपी क्रमांक दोन व तीन यांनी हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारले .
फिर्यादी अकीब छोटू शेख हा भावाला सोडवण्यासाठी गेला असता आरोपी क्रमांक एक याने त्याचे कडील शस्त्राने अकीबच्या डाव्या काखेखाली छातीजवळ वार करून गंभीर जखमी केले. या परिसरात आरोपींनी दहशत निर्माण करून बुलेटवर निघून गेले. याप्रकरणी प्रेमा उर्फ प्रेम्या य प्रकाश डोंगरे, जस्सू मंजीत पाल, ईशान रावसाहेब बोरुडे या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून संकेत नानासाहेब चौधरी हा फरार आहे. पिंपरी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

