फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

चौघांनी मिळून एका व्यक्तीचा केला खून !

चौघांनी मिळून एका व्यक्तीचा केला खून !

पिंपरी: बस वर चालक असताना अपघात केल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका व्यक्तीचा खून केला. 28 व 29 नोव्हेंबर दरम्यान मानकर पार्किंग अष्टविनायक कॉलनी वाकड येथे हा प्रकार घडला. दरम्यान यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी आजपर्यंत कोणालाही अटक केली नाही अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक सुदाम दराडे यांनी दिली.

 याप्रकरणी व्यवस्थापक कमलचंद, सुपरवायझर वशिष्ठ उर्फ अजय मुळीक, चालक अजय शेळके आणि हरिदास उर्फ पप्पू मोरे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सचिन धोंडीबा सोनकांबळे (वय 28) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल सोनकांबळे (वय 38 रा. मु. पो. ता. रोडा, जि. नांदेड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन हा चाकण येथे लक्ष्मी हॉलिडेज ट्रॅव्हल कंपनीत बसवर चालक म्हणून नोकरी स्वतः बस चालवत असताना अपघाताच्या कारणावरून चौघांनी मिळून त्याला अडवून डोक्यात गंभीर मारहाण केली. या त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

viara vcc
viara vcc

गावठी पिस्तूल बाळगल्याने एका व्यक्तीस अटक!
पिंपरी :अवैधरित्या आदेशाचा भंग करून देशी बनावटीचे 36 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व काडतुस जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही घटना तळेगाव दाभाडे पोस्ट हद्दीत एबीसी पेट्रोल पंप, शेजारील मोकळ्या मैदानात शुक्रवार 13 डिसेंबर रोजी दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घडली.

याप्रकरणी प्रकाश तात्याराम जाधव पोलीस शिपाई, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे .संदीप संजय राठोड (वय 23, रा. नळदुर्ग शास्त्री चौक ,ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार असल्याचे समजल्यानंतर आरोपीची झडती घेतली. त्यावेळी आरोपीकडे पिस्तुल मिळुन आले.त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तळेगाव पोलीस पुढील तपास करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"