फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
पुणे

पीएमआरडीएकडून भूखंडांचा ई-लिलाव जाहीर!

पीएमआरडीएकडून भूखंडांचा ई-लिलाव जाहीर!

पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवडमध्ये ३० महत्त्वाचे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महानगराच्या विकासाला ऐतिहासिक गती देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पीएमआरडीएच्या मालकीचे असलेले पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे ग्रामीण हद्दीतील विविध उपयोगांचे एकूण ३० भूखंड प्रथमच ८० वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर ऑनलाइन ई-लिलाव पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

viara vcc
viara vcc

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील भूखंडांमध्ये तीन शैक्षणिक वापराचे भूखंड, नऊ वाणिज्य व सार्वजनिक सुविधा भूखंड, एक वैद्यकीय वापराचा भूखंड, एक सार्वजनिक सुविधा (लायब्ररी/संगीत शाळा) भूखंड आणि एक फॅसिलिटी सेंटर भूखंड यांचा समावेश आहे. याशिवाय, पुणे ग्रामीण हद्दीतील १४ सुविधा भूखंड (Amenity Space) तसेच भांबुर्डा (शिवाजीनगर) येथील एक वाणिज्य भूखंडदेखील या ई-लिलावाचा भाग आहेत. या भूखंडांचे वाटप पात्र आणि इच्छुक व्यक्ती अथवा संस्थांना ई-लिलावाद्वारे केले जाणार आहे. या ई-लिलाव प्रक्रियेच्या अटी व शर्तींची सविस्तर माहिती https://eauction.gov.in आणि पीएमआरडीएचे अधिकृत संकेतस्थळ www.pmrda.gov.in वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे महानगराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

प्रमुख तारखा आणि प्रक्रिया
1 नोंदणी व कागदपत्रे डाऊनलोड करण्याची मुदत:* दि. १५ डिसेंबर २०२५, सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. १३ जानेवारी २०२६, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत इच्छुक व्यक्ती आणि संस्थांना https://eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
3 लाईव्ह ई-लिलाव (Live Auction)*: अंतिम ई-लिलाव प्रक्रिया दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.००
2. तांत्रिक बोलीदारांची घोषणा*: तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या बोलीदारांची घोषणा दि. २२ जानेवारी २०२६ रोजी केली जाईलवाजेपासून सुरू होईल.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"